इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड : बीडमध्ये एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे यांचा मृत्यू झाला आहे. माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर उभे असताना एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे.
मित्रांसह लग्न समारंभ आटोपून घरी येत असताना..
अधिक माहिती अशी की, माजलगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर उभे असताना एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश सचिव श्रीहरी काळे यांचे अपघाती निधन झाले आहे. श्रीहरी काळे आपल्या मित्रांसह लग्न समारंभआटोपून घरी येत असताना ही घटना घडली. या अपघातात काळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काळे हे मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटात कार्यरत आहेत. काळे यांच्या अपघाती निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या सहकाऱ्यांकडून या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.
अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.