Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजदुर्दैवी घटना...! खंबाटकी घाटात कंटेनरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

दुर्दैवी घटना…! खंबाटकी घाटात कंटेनरच्या चाकाखाली चिरडून महिलेचा जागीच मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या सहाव्या वळणावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भैरवनाथ मंदिराजवळ दुचाकीवरील महिलेचा तोल जाऊन कंटेनरच्या मागच्या चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

ही दुर्दैवी घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटाच्या सहाव्या वळणावर भैरवनाथ मंदिराजवळ घडली. नंदिनी राजेंद्र कळंगुडे (रा. सुलतानपूर, ता. वाई, जि. सातारा) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज सायंकाळी पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातून कंटेनर जात होता. यावेळी विरुद्ध बाजूने दुचाकी वाहन घेऊन दोघेजण निघाले होते. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेली महिला नंदिनी यांचा तोल गेला आणि त्या कंटेनरच्या मागच्या चाकाखाली सापडल्या. या घटनेत नंदिनी यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलीस व खंडाळा पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments