Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजदुभाजकास दुचाकी धडकून तरुण ठारः भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले

दुभाजकास दुचाकी धडकून तरुण ठारः भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बेदारकपणे भरधाव वेगात दुचाकी चालवणारा चालक दुभाजक सिमेंट कठड्याला स्वतःहून धडकून त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. पार्थ सारथी छल्ला (वय -50, राहणार -अभिनव कॉलेज समोर, पाषाण रोड, पुणे) असे मयत झालेल्या तरुणाचे इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव यांनी पार्थ छल्ला यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पार छल्ला हे त्यांच्या ताब्यातील मोटरसायकल एमएच-12, यु आर 58 46 वरून पाषाणहून वाकडेवाडीला जात होते. शिवाजीनगर परिसरात सेंट्रो मॉल जवळ आले असताना, त्यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन बेदरकपणे, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून दुभाजक सिमेंट कठड्याला स्वतःहून धडकून त्यात गंभीर जखमी होऊन स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाले आहे. याप्रकरणी पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहे.

कारची बुलेटला भीषण धडक तरुण जखमी

बाणेर परिसरात ज्योती अप्लाईन शॉपच्या लेन मधून ऑनलाईन डीपी रोडकडे 25 वर्षाचा करण भोसले हा तरुण बुलेट दुचाकीवर जात असताना, त्यास समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या एका कारने भरधाव वेगात धडक दिली. संबंधित कारचालकाने अविचाराने, हायगयने, भरगाव वेगाने वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून जोरात धडक दिल्याने त्याच्या उजव्या पायाचे हाड फॅक्चर झाले आहे. तसेच शरीरावर मुकामार लागून गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर कारचालक सदर ठिकाणी न थांबता निघून गेला आहे. यामध्ये बुलेट गाडीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत अज्ञात कार चालकावर चतुर्थिंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments