Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजदुभाजकाला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

दुभाजकाला धडकून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दुभाजकाला धडकून एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना येरवडा परिसरातील सादलबाबा चौकाजवळ बुधवारी (ता. २७) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

अरबाज जफर सय्यद (वय २३, रा. विद्यानगर, आदर्श कॉलनी, टिंगरेनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज दुचाकीवरून संगमवाडीकडून सादलबाबा चौकाकडे जात होता.

त्यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुभाजकाला धडकला. या अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक अमर कदम यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments