Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजदुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक, तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार !

दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक, तीनपट शुल्क भरुन चारचाकींसाठी राखून ठेवता येणार !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत (पुणे) : गुढीपाडवा सणानिमित्त पुणे प्रादेशिक परिवहनकार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारने व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह २६ मार्च २०२५ रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) 27 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असल्यास 27 मार्च रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज असल्यास त्याची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी 28 मार्च रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. प्राप्त अर्जाचा लिलाव त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सहकार सभागृहामध्ये करण्यात येईल.

अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘आर.टी.ओ., पुणे’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा.

पसंती क्रमांक आरक्षीत करण्याकरिता https://fancy.parivahan .gov.in या संकेतस्थळावर, नाव व आधार संलग्नित मोबाईल क्रमांक टाकून नाव नोंदणी करावी व त्यानंतर अर्ज व शुल्क भरणा करून पसंती क्रमांक आरक्षित करता येईल, असेही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments