Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजदुचाकी धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा अपघाती मृत्यू:

दुचाकी धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा अपघाती मृत्यू:

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील बाणेर परिसरात पॅनकार्ड क्लब रोडवर माऊली चौक या ठिकाणावरून पायी जात असलेल्या एका 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास आज्ञात दुचाकी चालकाने भरधाव वेगात येऊन धडक दिली. या धडकेत संबंधित जेष्ठ नागरिक गंभीर जखमी होऊन त्याचा रुग्णालयात नेले असताना मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. मुकुंद मनोहरराव जोशी (वय, 69, राहणार -बाणेर, पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावर चतुर्थिंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मयताचे भाऊ अविनाश मनोहरराव जोशी (वय – 59, राहणार -धायरी, पुणे) यांनी अज्ञात आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांचे भाऊ मुकुंद जोशी हे माऊली चौक या ठिकाणावरून पायी जात होते. त्यावेळी एका अज्ञात दुचाकी चालकानी त्याच्या ताब्यातील दुचाकीने भरधाव वेगात येऊन पाठीमागून त्यांना जोरात धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले मुकुंद जोशी रस्त्यावर पडून राहिले मात्र, त्यांना कोणतीही वैद्यकीय मदत न करता, सदर दुचाकी चालक घटनास्थळावरून पळून गेला. याबाबतची माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमीस रुग्णालयात नेले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत चतुर्सिंगी पोलीस पुढील तपास करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments