इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंड (पुणे): गेल्या काही दिवसांत चोरीचे प्रमाण वाढले असून चोरनवनवीन फंडे वापरून चोरी करत असल्याच्या घटना दररोज ऐकायला मिळतात. तसाच काहीसा प्रकार दौंड तालुक्यातील भांडगाव येथे रविवार (दि. १६) सकाळी ९:१५ च्या सुमारास घडला. एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्यांचे गंठण दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी काही समजायच्या आत चोरी करून पळ काढला आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेखा विलास भगत (रा. कोऱ्हाळे, ता. बारामती, पुणे) या त्यांच्या पतीसह कारने पुणे-सोलापूर महामार्गावरून जात असताना दौंड तालुक्यातील भांडगाव जवळ त्यांच्या कारचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे त्यांचे पती विलास भगत यांनी गाडीचे टायर बदलण्यासाठी गाडी सर्व्हिस रोडवर घेतली.
फिर्यादीचे पती कारचा पंक्चर झालेला टायर बदली करत असताना त्या ठिकाणी दोन अनोळखी इसम काळ्या रंगाच्या मोटार सायकलवर आले आणि त्यांनी फिर्यादी रेखा भगत यांच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण जोरात हिसका मारून चोरी केले. त्यानंतर ते सर्व्हिस रोडने पुणे बाजुकडे जोरात निघून गेले.