Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजदुचाकीवरील महिलेचे चार लाखांचे दागिने चोरले; आळंदी रस्त्यावरील घटना

दुचाकीवरील महिलेचे चार लाखांचे दागिने चोरले; आळंदी रस्त्यावरील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरात महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता आळंदी रस्त्यावर दुचाकीवरील सहप्रवासी महिलेकडील तब्बल चार लाखांचे दागिने असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेल्याची संतापजनक घटना घडली आहे. दागिने चोरणाऱ्या चोरट्याने धक्का दिल्याने दुचाकी घसरली. सुदैवाने या घटनेत दुचाकीस्वार पती आणि महिलेला गंभीर दुखापत झाली नाही.

याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. महिलेच्या नात्यातील एकाचा विवाह समारंभ दिघी येथे होता. सोमवारी (१६ डिसेंबर) विवाह समारंभावरुन महिला आणि पती दुचाकीवरुन घरी निघाले. विवाह समारंभात परिधान केलेले चार लाख दहा हजारांचे दागिने महिलेने पिशवीत ठेवले होते. आळंदी रस्त्यावर बोपखेल फाट्याजवळ रात्री पावणेदहाच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी तक्रारदार महिलेकडील दागिने असलेली पिशवी चोरून नेली, अशी माहिती विश्रांतवाडी पोलिसांनी दिली.

चोरट्यांनी धक्का दिल्याने दुचाकी घसरली. सुदैवाने या घटनेत महिला आणि तिच्या पतीला गंभीर दुखापत झाली नाही. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी आळंदी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments