इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पाच वर्षानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आला असल्याचा आरोप दिशाचे वडील सतीश सालियन यांनी केला होता. त्यांनी अॅड. नीलेश ओझा यांच्यामार्फत याप्रकरणी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र या प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला असून अॅड. नीलेश ओझा यांच्या विरोधातच मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालय अवमानाची कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दिशा सालियन प्रकरणात अॅड. नीलेश ओझा यांनी पत्रकार परिषदेमध्ये न्यायालयाचा अवमान आणि बदनामी होईल, असे वक्तव्य केले होते. त्यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणात न्यायाधीश रेवती मोहिते डेरे यांचे नाव घेत अपमानास्पद आणि बदनामीकारक टिप्पणी करत आरोप लावले होते. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने अॅड. ओझा यांच्या विरोधात अवमानाची कारवाई सुरू केली आहे. ओझा यांची विधाने ही प्रथम दर्शनी न्यायालयाचा अवमान करणारी आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयाने अवमान कायदा नियम 1994 च्या नियम 8 व नियम (1) अन्वये नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ओझा यांनी केलेले वक्तव्याबाबत हायकोर्टातील बेंचसमोर सुनावणी पार पाडली. या सुनावणीमध्ये ओझा यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप ऐकवण्यात आली. त्यांची वक्तव्य ऐकून बेंचमधील न्यायाधीशांनी त्यांना चांगलेच खडसावले.
दिशा सालियनचे यांचे वडील सतीश सालियन यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे व अन्य काही विरोधात एफ आयआर नोंदवून सीबीआय चौकशीसाठी एडवोकेट ओझा यांच्या मार्फत याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीपूर्वीच ओझा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत न्यायालयाची अवमान करणारी वक्तव्य केली आहेत.