Thursday, November 7, 2024
Homeक्राईम न्यूजदिवाळीत मुंबई-लातूर साप्ताहिक विशेष ट्रेन चालवणार; पुणे जिल्ह्यात 'या' ठिकाणी थांबणार

दिवाळीत मुंबई-लातूर साप्ताहिक विशेष ट्रेन चालवणार; पुणे जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी थांबणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : दिवाळी सणानिमित्त मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लातूर साप्ताहिक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. एकूण आठ गाड्या चालवण्यात येणार आहेत. साप्ताहिक विशेष गाडी १९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत धावणार असून चार फेऱ्या करण्यात येणार आहेत. दर शनिवारी रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणार असून लातूर येथे त्याच दिवशी सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी पोहोचणार आहे. तर, साप्ताहिक विशेष गाडी १९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या दरम्यान धावणार असून, चार फेऱ्या करण्यात येणार आहेत.

लातूर येथून दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी सुटणार असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचणार आहे. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, उरुळी, दौंड, भिगवण, जेऊर, केम, कुर्दुवाडी, बारसी टाउन, उस्मानाबाद आणि हरंगुळ आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments