इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवासस्थानी कोट्यवधींच घबाड सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था हादरली असून या घटनेवर सुप्रीम कोर्टाने कठोर पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी घरी नोटांचे ढीग आढळले आहेत. त्यांच्या निवासस्थानी आग लागल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी पोलिस आणि अग्निशमक दलाला दिली होती. पोलिस त्यांच्या घरी आग आटोक्यात आणण्यासाठी आले तेव्हा त्यांना एका खोलीमध्ये कोट्यवधींची रक्कम दिसली. ही रक्कम बेकायदा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठे पाऊले उचलले आहे. त्यानंतर आता या घटनेची चौकशी केंद्रीय गुन्हे शाखा आणि ईडी करण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यामुळे न्यायाधीशांच्या अडचणीत आता आणखीनच वाढ होणार आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने या घटनेवर कठोर पावले उचलत संबंधित न्यायाधीशांची बदली आता अलाहाबाद येथे केली असल्याची माहिती समोर आली आहे. न्यायाधीशांच्या घरी बक्कळ कॅश आढळल्याने सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे.