इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी करण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या हाती आलेल्या आकडेवारीनूसार भाजपने यंदा दिल्लीत जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. आप मात्र पिछाडीवर असल्याने आपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे प्राथमिक कल समोर आले असून सकाळी 9.30 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनूसार भाजप 48, आम आदमी पक्ष 21 आणि काँग्रेस पक्ष 1 जागांवर आघाडीवर आहे.
दिल्लीत बहुमतासाठी 36 मॅजिक फिगर गाठणं आवश्यक आहे. त्यामुळे भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल दिसून येत आहे तर आप मात्र पिछाडीवर आहे.