इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दिल्ली : दिल्लीकरांनी विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळून दिले. मात्र, निकाल लागून दहा दिवस उलटून गेले, तरी दिल्लीकरांना नवा मुख्यमंत्री कोण असेल? याची उत्सुकता लागून होती. अखेर दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. दिल्लीतील भाजप आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
तसेच नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर असलेले प्रवेश शर्मा हे उपमुख्यमंत्री असणार आहेत. आता रेखा गुप्ता गुरुवार (दि.२० फेब्रवारी) रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. रेखा गुप्ता आणि प्रवेश वर्मा बुधवारी साडे बारा वाजता रामलीला मैदानात शपथ घेतील. यावेळी मंत्रिमंडळाचाही शपथविधी होणार आहे. भाजपच्या वरिष्ठांनी आमदारांच्या बैठकीत वरिष्ठ नेता ओपी धनखड आणि रविशंकर प्रसाद यांची नियुक्ती केली होती.
दहा दिवस उलटून गेल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीत भाजपला २६ वर्षांनी मोठा विजय मिळाला आहे. आठ फेब्रवारी रोजी भाजपला ७० जागांपैकी ४८ जागा मिळाल्या. त्यानंतर ११ दिवसांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करण्यात अली.