Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजदिलासादायक ! पुण्यात २४ तासांत जीबी सिंड्रोमच्या एकाही रुग्णाची नोंद नाही; रुग्णसंख्या...

दिलासादायक ! पुण्यात २४ तासांत जीबी सिंड्रोमच्या एकाही रुग्णाची नोंद नाही; रुग्णसंख्या १३० वर स्थिर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये जीबीएस आजारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जीबी सिंड्रोम आजाराच्या रुग्णसंख्येमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे पुणेकरांचे चिंतेत वाढ झाली होती. या आजारामुळे राज्यात दोघांचा मृत्यू झाला. पहिला मृत्यू सोलापुरात तर दुसरा मृत्यू पुण्यामध्ये झाला. त्यामुळे पुणेकर चांगलेच धास्तावले आहेत. पण आता पुणेकरांना काहिसा दिलासा मिलाल्याचे चित्र आहे. कारण पुण्यात गेल्या २४ तासामध्ये जीबी सिंड्रोमची लागण झालेला एकही रुग्ण सापडून आला नाही. रुग्णांची सख्या १३० वर स्थिर झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या २४ तासांत एक ही जीबीएस रुग्णाची नोंद झाली नसून पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या १३० वर स्थिर झाली आहे. यामधील २५ रुग्ण पुणे शहरातील असून इतर ७४ रुग्ण पुणे महापालिकेच्या नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील आहेत. एकूण रूग्णांपैकी २० रुग्ण व्हेंटिलेटर असून पुण्यातील कमला नेहरू रुग्णालय यासह इतर रुग्णालयात या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यामध्ये बुधवारी जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला असून ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १३० वर पोहचली आहे. पुण्यातच नाही तर सोलापूर आणि सांगली याठिकाणी जीबी सिंड्रोमची लागण झालेले रुग्ण सापडले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments