इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने गर्भवती महिलेला उपचारासाठी दाखल करण्याअगोदर डिपॉझीट म्हणून पैशांची मागणी केली होती. पैशाच्या हव्यासापोटी रुग्ण महिलेला उपचार न मिळाल्यामुळे जीव गमावावा लागला आहे. त्यानंतर या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगेशकर रुग्णालयावर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, या घटनेवर बोलताना राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी, संबंधितांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल असे म्हटले आहे.
राज्यमंत्री मोहोळ माध्यामांशी बोलताना म्हणाले, ‘समाजातील सर्व स्तरातून घडलेल्या या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. मंगेशकर रुग्णालयातील घटना अत्यांत दुर्दैवी आहे.’ या प्रकरणासंबंधित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच, या प्रकरणात दोषी कोणतीही व्यक्ती असो किंवा संस्था, संबंधितांवर निश्चितच कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री मोहोळ म्हणाले.