इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : 26 सप्टेंबर 2023 | आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं • आहे. आता ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. वहिदा रहमान यांनी ६० – ७० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. वहिदा रहमान आणि देव आनंद यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘सीआयडी’ पासून ‘गाईड’ पर्यंत या दोघांनी अनेक उत्तम चित्रपट एकत्र केले आहेत.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. अनुराग ठाकूर ट्विट करत म्हणाले, वहिदा रहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल या वर्षी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, हे जाहीर करताना मला अत्यंत आनंद आणि सन्मान वाटतो. सध्या सर्वत्र अनुराग ठाकूर यांच्या ट्विटची चर्चा रंगत आहे.