Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज दारूच्या नशेत सासवड तहसीलमधून ईव्हीएम युनिट चोरणारे दोघे अटकेतः एक सराईत गुन्हेगार,...

दारूच्या नशेत सासवड तहसीलमधून ईव्हीएम युनिट चोरणारे दोघे अटकेतः एक सराईत गुन्हेगार, तर दुसरा संशयित नवखा आरोपी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सासवडमधील तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून मतदान यंत्रे (ईव्हीएम कंट्रोल युनिट) चोरून पसार झालेल्या दोन चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली. हे दोन्ही चोरटे सराइत असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. भैय्या उर्फ शिवाजी रामदास बंडगर (वय २१), अजिंक्य राजू साळुंखे (२१, दोघे रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी दारूच्या नशेत ही चोरी केल्याची कबुली दिली.

सासवड येथील तहसीलदार कार्यालयात मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. चोरट्यांनी तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. खोलीतील लोखंडी मांडणीवर मतदान यंत्रे ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी एक मतदान यंत्र (डेमो) चोरून नेल्याचे मंगळवारी उघडकीस आले. ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सासवड पोलिसांचे पथकाने चोरट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस अधीक्षक देशमुख यांनी सांगितले की, शिवाजी बंडगर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीचे जेजुरी आणि यवत पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहे. यात खूनाचा प्रयत्न आणि विनयभंग या गुन्ह्यांचा समावेश आहे. तर दुसरा आरोपी अजिंक्यवर हा पहिलाच गुन्हा आहे. त्यांनी ईव्हीएम का चोरी केले याबाबतचा तपास पोलिस करत आहेत.

प्रांताधिकारीसह ६ जण निलंबित

या प्रकरणी निवडणूक आयोगाने पुरंदर- दौंड प्रांतधिकारी वर्षा लांडगे-खत्री, तहसीलदार विक्रम रजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, पोलिस निरीक्षक संतोष जाधव, सहायक फौजदार डी. एल. माने, गृहरक्षक दलाचे जवान राहुल जरांडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. ईव्हीएम सुरक्षा करण्यात कसा हलगर्जीपणा झाला आहे आणि सुरक्षा नियमांचे पालन का करण्यात आले नाही याबाबतचा खुलासा तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी १२ फेब्रुवारीपर्यंत करावा, असे निर्देश आयोगाने दिले आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments