Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजदापोडी येथील मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या : आमदार राहुल कुल

दापोडी येथील मृतांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्या : आमदार राहुल कुल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत : दौंड तालुक्यातील केडगाव जवळील दापोडी येथे विजेचा धक्का लागल्याने पती-पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि. १७) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सुरेंद्र भालेकर (वय-४५) आदिका भालेकर (वय-३८) आणि त्यांचा लहान मुलगा प्रसाद भालेकर (वय-१९) यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल कुल यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता दरवडे यांच्या समवेत घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी भालेकर कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच या दुर्दैवी घटनेची चौकशी करून मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी संबंधितांना सूचना दिल्या.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे विजेचे खांब पडणे, शॉर्टसर्किट होणे, रोहित्र जळणे अशा घटना घडत आहेत. याबाबत नागरिकांनी विजेची उपकरणे हाताळताना सतर्कता बाळगावी व योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन देखील राहुल कुल यांनी नागरिकांना केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments