इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाशी संबंधित आरोपींच्या असलेल्या संबंधांवारून मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर धनंजय देशमुख यांचा साडू दादा खिंडकर याने तरुणाला अमानुष मारहाण केल्याच्या व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर दादा खिंडकरवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दादा खिंडकर याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला अटक केल्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी खिंडकर याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने सातपुते यांच्या घरावर हल्ला केला होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल आहे.
खिंडकरवर मोकोका अंतर्गत कारवाई करावीः
सातपुते
अधिक माहिती अशी की, दादा खिंडकर विषयी परमेश्वर सातपुते यांनी गंभीर आरोप केले आहेत. दादा खिंडकर याच्यावर घरफोडी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीखाली तीन गावे आहेत. तो वाल्मीक कराड पेक्षाही मोठा गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करून त्याला अटक करावी, अशी मागणी सातपुते यांनी केली आहे.
खिंडकरचा ‘आका’ कोण?
तो माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाचा कार्यकर्ता आहे. अमरसिंह पंडित यांनीच त्याची पाठराखण केली. त्यामुळे अमरसिंह पंडित हाच खिंडकरचा अका असल्याचा गंभीर आरोप सातपुते यांनी केला आहे.