Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजदहा सट्टेबाज गजाआडः आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या आरोपींवर पुण्यात गुन्हे शाखेचा...

दहा सट्टेबाज गजाआडः आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या आरोपींवर पुण्यात गुन्हे शाखेचा छापा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सद्या आयपीएल क्रिकेट सामने सुरू असून पुणे शहरातील कोथरुड परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गजाआड केले आहे. उजवी भुसारी कॉलनी परिससरातील एका इमारतीत सदरची कारवाई करण्यात आली. सट्टेबाजांकडून मोबाइल, लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुकेशकुमार शैलेंद्रकुमार साहू (वय २४), देवेंद्र कमलेशकुमार यादव (वय २१), जसवंत भूषणलाल साहू (वय २२), राहुलकुमार गणेश यादव, रोहितकुमार गणेश यादव (वय २६), दुष्यंत कोमलसिंह सोनकर (वय २३), संदीप राजू मेश्राम (वय २१), अखिलेश रुपाराम ठाकूर (वय २४), मोहम्मद ममनून इस्माइल सौदागर (वय ३२), अमित कैलास शेंडगे (वय ३२) अशी अटक करण्यात आलेल्यां आरोपीची नावे आहेत. आरोपी साहू, यादव, सोनकर, ठाकूर, मेश्राम मूळचे छत्तीसगडचे आहेत. याबाबत खंडणी विरोधी पथकाचे सहायक फौजदार प्रवीण ढमाळ यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

कोथरुडमधील उजवी भुसारी कॉलनी परिसरातील पटेल टेरेस इमारतीत आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. तेथून लॅपटॉप आणि मोबाइल संच असा दोन लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील पुढील तपास करत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments