Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज दहाव्या मजल्यावरून पडला मजूर, जिवानिशी गेला; ठेकेदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दहाव्या मजल्यावरून पडला मजूर, जिवानिशी गेला; ठेकेदारासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : नियोजित गृहप्रकल्पाचे काम करताना दहाव्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. निकृष्ट दर्जाच्या सेफ्टी जाळ्या बसविल्याने ९ व्या, ७ व्या, ५ व्या, तसेच दुसऱ्या मजल्यावरील या जाळ्या तुटून पहिल्या मजल्यावर पडून या मजुराचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्यामुळे सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी दोन ठेकेदारांविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

बिश्वनाथ खुदीराम बिश्वास (वय ३१) असे मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे. बिश्वासचा भाऊ अभिजित (वय ३२, रा. लेबर कॅम्प, खराडी) याने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ठेकेदार फहिम उस्मान शेख (वय ३३, रा. संजय पार्क, लोहगाव) आणि दीपन देवास समाजदार (वय ३६, रा. वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्वनाथ, सहकारी मजूर सरदार, सुशांतो, भौमिक खराडीतील एका नियोजित गृहप्रकल्पात काम करत होते. त्यावेळी बिश्वास हा १० व्या मजल्यावर किचन रूममधील सेंट्रिंग खोलण्याचे काम करीत होता. त्यावेळी तोल जाऊन बिश्वनाथ थेट डक्टमध्ये खाली पडला. डोक्याला गंभीर जखमी झालेल्या बिश्वनाथचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. ठेकेदारांना नियोजित गृहप्रकल्पातील मजुरांच्या सुरक्षेसाठी पुरेशा उपाययोजना केल्या नाहीत, तसेच निकृष्ट दर्जाची सुरक्षा जाळी तुटून खाली पडल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक खांडेकर तपास करत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments