Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजदहावीच्या विद्यार्थिनीला शाळेच्या मुख्याध्यापकांने पाठवले अश्लील व्हिडिओ, गुन्हा दाखल झाला अन्...

दहावीच्या विद्यार्थिनीला शाळेच्या मुख्याध्यापकांने पाठवले अश्लील व्हिडिओ, गुन्हा दाखल झाला अन्…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नांदेड : राज्यात महिला मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशातच आता नांदेड जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांने दहावी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीला अश्लील व्हिडीओ पाठवला. असल्याची माहिती समोर आली आहे.. त्यानंतर हे प्रकरण थेट पोलीस स्टेशनपर्यंत गेलं. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होताच बदनामीच्या भीतीने मुख्याध्यापकांने विष पिऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड शहराजवळ असलेल्या पासदगाव येथे पुष्पांजली माध्यमिक शाळा आहे. या शाळेवर सुनील कारामुंगे हे मुख्याध्यापदी कार्यरत आहेत. त्यांनी शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील व्हिडीओ पाठवले होते. पीडित मुलीच्या कुटुंबीयांना याबाबत समजलं तेव्हा त्यांनी मुख्याध्यापक कारामुंगेंविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल होताच बदनामी होईल या भीतीने मुख्याध्यापक सुनील कारामुंगे यांनी विष प्राशन केलं. कुटुंबीयांनी तात्काळ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केला असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान आत्महत्या पूर्वी मुख्याध्यापकांनी लिहिलेल्या चिठ्ठीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या चिठ्ठीत पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी माझा मानसिक छळ केला आहे त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याबद्दलची पडताळणी सुरू असल्याचं पोलिसांना सांगितलं असून या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments