Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजदर्गा कारवाईची खोटी चित्रफित केली प्रसारितः तणाव निर्माण केल्याचा आरोप; 3 जणांवर...

दर्गा कारवाईची खोटी चित्रफित केली प्रसारितः तणाव निर्माण केल्याचा आरोप; 3 जणांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गा येथील परिसरात मनपा आणि पोलीस कारवाई करण्यात येत असल्याचा खोटा संदेश प्रसारित करून दोन धर्मा त जातीय तेढ निर्माण होईल अशाप्रकारे जातीय तणाव निर्माण केल्या प्रकरणी वानवडी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आयान मेहबूब शेख, इब्राहिम आयाज शेख (दोघे रा. काळेपडळ, हडपसर, पुणे), शाहरुक लईक शेख (रा. आझादनगर, वानवडी, पुणे) अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आरोपी शेख यांच्याविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती वानवडी पोलिसांनी दिली आहे.

कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गाह परिसरात महापालिकेकडून कारवाई करण्यात येत असल्याचा दिशाभूल करणारा संदेश आरोपी शेख यांनी समाजमाध्यमात प्रसारित केला होता. यामुळे जातीय तणाव निर्माण झाला. पोलिसांच्या चौकशी दरम्यान शेख यांनी समाजमाध्यमातील स्वतःच्या खात्यातून संदेश प्रसारित केल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे पुढील तपास करत आहेत.

लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

लग्नाचे आमिषाने एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध हडपसर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. ओंकार रवीकिरण पुराणिक (वय -२८, रा. पवडेवाडी, फरांदेनगर, जि. नांदेड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे.

तक्रारदार तरुणी आणि पुराणिक एकमेकांचे ओळखीचे आहेत. पुराणिकने तरुणीला विवाहाचे आमिष दाखवून प्रेमाचा जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने लग्नास टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस दराडे पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments