Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजदगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिलेल्या महिलेच्या कडेवरली मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी...

दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिलेल्या महिलेच्या कडेवरली मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न; दोन महिलांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या महिलेच्या कडेवरील मुलाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. माधुरी संतोष डुकळे (घाडगे) (वय 23 वर्ष) आणि काव्या तनवीर जाधव (वय 21 वर्ष, दोघी रा. रेल्वे फाटकाजवळ, यवत) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत.

याबाबत सोनाली सुहास बोराटे (वय 26 वर्ष, रा. विठ्ठलवाडी, ता. इंदापूर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदिरातील दर्शन रांगेत रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनाली बोराटे या आपल्या लहान मुलाला कडेवर घेऊन दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या होत्या. तेंव्हा त्यांच्या मागे असलेल्या दोन महिलांनी फिर्यादी बोराटे यांच्या कडेवर असलेल्या मुलाच्या गळ्यातील सोन्याचीसाखळी चोरण्याच्या उद्देशाने तोडण्याचा प्रयत्न केला. घडणारा प्रकार फिर्यादी यांच्या पटकन लक्षात आला. त्यांनी तत्काळ तेथे असलेल्या मंदिराच्या सुरक्षारक्षकाला याबाबत कळवले. सुरक्षारक्षकाने त्या दोन महिलांना पकडून विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस हवालदार गणेश काटे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments