इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील दक्षिण भागातील स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरील भूमिगत स्थानकांच्या जागांमध्ये बदल करण्यात आले आहे. या मार्गावर ३ ऐवजी ५ भूमिगत मेट्रो स्टेशन तयार केली जाणार आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील दोन मागार्चे काम पूर्ण झाले आहे. वनाज ते रामवाडी, पिपंरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. यामधील पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मार्गाचे दोन्ही बाजूला विस्तारीकरण केले जाणार आहे.
पिंपरी चिंचवड ते निगडी पर्यंत रूट असणार आहे, याचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या मार्गाला मंजूरी देऊन त्याचेही काम निविदा काढून लवकरच सुरू केले जाणार आहे. मात्र, निविदा काढण्याआधी स्वारगेट ते कात्रज मार्गावर प्रस्तावित केलेल्या ३ भूमिगत स्थानकांवर लोकसंख्येच्या घनतेचा विचार करून योग्य बदल करण्याची मागणी विविध लोकप्रतिनिधींनी महामेट्रो प्रशासनाकडे केली होती.
मार्गाच्या या पूर्वीच्या मार्केटयार्ड, पद्मावती व कात्रज स्टेशनचा समावेश होता. कात्रज स्थानक राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या जवळ दाखविण्यात आले होते. नव्या डीपीआरमध्ये ३ च्या ऐवजी ५ स्टेशन प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये बालाजीनगर व बिबवेवाडी-सहकारनगर स्थानकांचा समावेश आहे, स्थानकांच्या जागांमध्ये बदल केल्यानंतर नव्या डीपीआरला मनपाच्या साधारण सभेची मंजूरी घेऊन प्रस्ताव राज्य सरकारकडे पुढील मंजूरीसाठी पाठविला आहे.
नवीन मेट्रो स्टेशनचे नाव, प्रत्यक्ष ठिकाण : मार्केटयार्ड-उत्सव हॉटेल चौक, बिबवेवाडी/सहकारनगर नातूबाग, पद्मावती -श्री सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ, बालाजीनगर- भारती विद्यापीठ, कात्रज – कात्रज बसस्टँड, किनारा हॉटेल जवळ