इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, ता 23: नायगाव ते थेऊर शिवरस्त्यावरून अवैधहातभट्टीची वाहतूक करणारी कार लोणी काळभोर पोलिसांनी पकडली आहे. ही. कारवाई थेऊर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता.23) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास केली आहे. या कारवाईत पोलिसांनी कारसह सुमारे 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकाला बेड्या ठोकल्या आहेत.
संदीप प्रताप जाधव (वय 25, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर याप्रकरणी पोलिस अंमलदार प्रशांत सुतार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार प्रशांत सुतार हे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना नायगाव ते थेऊर शिवरस्त्यावरून अवैध हातभट्टीची चारचाकी गाडीतून वाहतूक होणार आहे. अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून संशयित मारुती कंपनीची (गाडी नंबर एम. एच 12 एफ एफ 7457) कार अडविली. गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये गावठी हातभट्टीची सुमारे 350 लिटर दारु 10 केंन्डमध्ये मिळून आली.
पोलिसांनी या कारवाईत कारसह सुमारे 2 लाख 35 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दारूची वाहतूक करणारा आरोपी संदिप जाधव यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कायदा कलम 65 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विजय जाधव करत आहेत.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस विजय जाधव, पोलिस अंमलदार प्रशांत सुतार, सागर कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.