Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजथेऊर येथे दुचाकी व कंटेनरचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एकजण जखमी...

थेऊर येथे दुचाकी व कंटेनरचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू, एकजण जखमी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

थेऊर, (पुणे) : थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीजवळील वळणावर दुचाकी व कंटेनरचा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. आज सोमवारी (ता. 02) सकाळी पाऊणे दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

अपघातात मयत झालेल्या तरुणाचे व जखमीचे नाव अद्याप समजू शकले नसून केसनंद व वाघोली बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरील दोघेजण वाघोली बाजूकडे दुचाकीवरून निघाले होते. यावेळी थेऊर हद्दीतील स्मशानभूमीजवळ असलेल्या वळणावर दुचाकी चालकाला उतार व वळणाचा अंदाज न आल्याने दुचाकी चालक थेट कंटेनरच्या खाली घुसली.

दरम्यान, या घटनेत दुचाकीवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments