इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सासवडः थापे-वरवडी (ता. पुरंदर) येथील गावच्या सरपंच पदी रूपाली अशोक खवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मोरे यांनी दिली.
सरपंच रूपाली संजय खवले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागी रूपाली अशोक खवले यांची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस. एम. संपकाळ व तलाठी महेंद्र मेत्रे उपस्थित होते. ही निवड भारतीय जनता पार्टीचे गंगाराम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बिनविरोध निवडीनंतर ग्रामस्थांकडून त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला.
निवडणूक प्रसंगी थापे-वारवडी उपसरपंच सुरेश खवले, सदस्य शिवाजी खवले, निलेश जगदाळे, सदस्य मुक्ताबाई पवार आदी उपस्थित होते. यावेळी रोहित खवले, शिवाजी शेडकर, दत्तात्रय शेडकर, हनुमंत खवले, धोंडीबा खवले, बाळासाहेब खवले, पांडुरंग खवले, रोहिदास खवले, अशोक खवले, सर्जेराव खवले, शिवाजी खवले, राजाराम खवले, गणेश खवले, पोपट खवले, चक्रधर दूरकर, सागर फडतरे, अशोक खवले, कैलास खवले, विजय खवले, चेतन जगदाळे, अनिल खवले, विलास खवले, अभिजीत खवले, अमित खवले, आदी उपस्थित होते.
नूतन सरपंच पुढे बोलताना म्हणाल्या की, गावातील पाणी, रस्ता, वीज, घरकुल योजना, शासनाच्या विविध असणाऱ्या योजना या तळागाळापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या पदाचा वापर माता, भगिनी, शेतकरी यांच्यासाठी व गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सर्वांना सहमतीत घेऊनच, करणार आहे. असे नुतन सरपंच रुपाली अशोक खवले यांनी सांगितले.