इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुरंदर : थापेवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचेअरमन पदी रोहित सोपान खवले यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुरंदर तालुक्यातील थापेवाडी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित थापेवाडीचे चेअरमन राजाराम खवले यांची मुदत संपल्याने, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या पदावर एकमेव अर्ज आल्याने, रोहित सोपान खवले यांची सोसायटीच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमरीन बागवान यांनी जाहीर केले.
पुणे जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली थापेवाडी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी रोहित खवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन राजाराम खवले, व्हाईसचेअरमन चंद्रभागा खवले, संचालक हनुमंत खवले, संदीप खवले, लक्ष्मण खवले, शारदा खवले, बाळासो खवले, सरपंच रूपाली खवले, उपसरपंच सुरेश खवले, माजी सरपंच निलेश जगदाळे, योगेश जगदाळे, दत्तात्रेय भगवान जगदाळे, बाळासो दूरकर, माजी उपसरपंच बाळासो रावडे, धोंडीबा खवले, उत्तम खवले, अशोक खवले, गणेश खवले हे उपस्थित होते.