इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांन सोबत भावाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरोपी दत्तात्रय गाडेच्या भावाने अनेक खुलसे केले आहेत.
घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोपी दत्तात्रय गाडेचा भाऊ म्हणाला, “आरोपी दत्तात्रय गाडे हा गुलटेकडी भाजी बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. तिथून येत असताना स्वारगेट बस स्थानकात हा प्रकार घडला असेल. आम्हाला पोलीस प्रशासनावर आणि कोर्टावरही विश्वास आहे. ज्या पीडित तरुनीबरोबर ही घटना घडली, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणात न्यायालय जोही निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे. न्यायालयाने दत्तात्रय गाडेला फाशीची शिक्षा दिली, तरी आम्हाला मान्य आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्हाला कसलेही वाईट वाटणार नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.
भावावरील गुन्ह्यांची कल्पना..
आरोपीचा भाऊ पुढे बोलताना म्हणाला, “गावातली लोकं आता आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत. आमच्यासोबत संपर्क ठेवण्याची त्यांना अजिबात इच्छा नाही”. आरोपी दत्तात्रय गाडेच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? असा प्रश्न पत्र कारांनी विचारला. त्यावर आरोपीचा भाऊ म्हणाला, “त्याच्यावरील गुन्ह्यांची आम्हाला माहिती आहे. त्याची सहापैकी एका गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झालेली असल्याचेही त्याने सांगितले.
यावेळी, भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे मी त्याच्याशी फार बोलत नव्हतो, असेही गाडेच्या भावाने म्हटले आहे. तो गावातून भाजीपाला आणून शहरात विकत होता. तो माझा भाऊ असला तरी गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहीजे, अशी स्पष्ट भूमिका आरोपी गाडेच्या भावाने पत्रकार परिषदेत मांडली.