Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजतू मला खूप आवडते, माझ्याशी लग्न कर', असे म्हणत जबरदस्तीने ओढत नेले...

तू मला खूप आवडते, माझ्याशी लग्न कर’, असे म्हणत जबरदस्तीने ओढत नेले आणि…; केडगावमधील धक्कादायक प्रकार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

यवत (पुणे) : गुऱ्हाळावर काम करणाऱ्या एका परप्रांतीय युवकानेअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी यवत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. केडगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी (ता. 30) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

समीर इम्रान फरीदी (रा. केडगाव, मुळ रा. राज्जोपुर, ता. देवबंद, जि. सहारनपुर – उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. केडगाव परिसरात एका गुन्हाळावर समीर फरीदी हा काम करतो. गुरुवारी संध्याकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एका मुलीला तू मला खूप आवडते, माझ्याशी लग्न कर, असे म्हणत जबरदस्तीने ओढत नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कोणालाही काही सांगितल्यास आई-वडिलांना राहू देणार नाही अशी धमकी दिली.

दरम्यान, याबाबत पिडीत मुलीने यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार समीर फरीदी याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments