इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
तुळजापूर : राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्स प्रकरणातनवनवीन खुलासे होत असून आता ड्रग्स तस्करी प्रकरणी मुख्य आरोपी पूजा गोळे, सूत्रधारासह 35 पेक्षा जास्त जणावर गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी व दक्ष पुरवठा करणाऱ्या एजंटमार्फत ड्रग्सचा पुरवठा होत होता. या प्रकरणात 16 पुजारी गुन्ह्यात समाविष्ट असल्याची माहिती समोर आली असून त्यांना मंदिर प्रवेश बंदी करण्याचा इशारा मंदिर संस्थांनी दिला आहे.
तुळजापूर ड्रग्स प्रकरणात तुळजाभवानी मंदिर पुजाऱ्यांची नावे समोर आल्याने त्यांना मंदिरात प्रवेश बंदी करणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पुजारी व मंदिर प्रशासनात वाद निर्माण झाला. विशेष म्हणजे पुजारी हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आता याप्रकरणी 16 पुजाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असून अनेकांना चौकशीसाठी पोलिसांनी नोटीसा पाठवल्या आहेत. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर पुजारी ही आक्रमक झाले. देऊळ कवायत कायदा पुजाऱ्यावर कार्यवाहीसाठी नाही कायद्याचा आधार घेऊन पुजाऱ्यावरील दंडमशाही थांबवा असा हल्लाबोल पुजाऱ्यांनी प्रशासनावर केला आहे.
दरम्यान या ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 35 जणांना आरोपी करण्यात आल असून, 80 जणांना चौकशीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्या पुजाऱ्यांवरही मंदिर प्रदेश बंदीची कारवाई होणार आहे. या प्रकरणात मंदिरातल्याच पुजाऱ्यांचाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.