इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिरूर : “तुला माझ्या गाडीवरून शाळेतसोडतो”, असे सांगून आरोपीने न्हावरे येथील एका अल्पवयीन विद्यार्थिनीला शिरूरच्या पुढे नेऊन एका लॉजवर मुलीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे शिरूर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ‘पोक्सो’ कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून, आरोपीला अटक केली आहे.
कुणाल अशोक गारगोटे (वय-१९ वर्ष, रा. न्हावरे, ता. शिरूर, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची फिर्याद अल्पवयीन पिडीतेने शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, पीडित अल्पवयीन मुलगी ही सकाळच्या वेळेस तिच्या घरुन रस्त्याने शाळेत चालली असताना, आरोपी पाठीमागून दुचाकीवर मुलीच्या जवळ आला आणि बळजबरीने मुलीला गाडीवर बसण्यास सांगितले व तुला शाळेत नेऊन सोडतो असे सांगून, शिरूरच्या पुढे एका लॉजवर नेऊन आरोपीने मुलीवर अत्याचार करून शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे पोक्सो कायाद्या अंतर्गत शिरूर पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली आहे
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर शेळके करत आहेत.