इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
झोप ही शरीरासाठी आवश्यक असते. योग्यवेळी झोपणे आणि योग्यवेळी उठणे ही आरोग्यासाठी एक चांगली बाब आहे. त्यात कमी झोप अनेक समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पुरेशी झोप घेण्याकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. जर तसे नाही केले तर अनेक तोटे तुम्हाला होऊ शकतात.
कमी झोपेमुळे शरीरावर अनेक नुकसान होऊ शकते. कार्यक्षमतेत घट होऊ शकते. चिंता आणि नैराश्येसह मानसिक विकारांचा धोका निर्माण होऊ शकतो. उच्च रक्तदाब आणि अनियमित हृदयाची लय यांसारख्या हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे वारंवार आजारपण येऊ शकते. भूक प्रभावित करणारे हार्मोन्स अनियमित होऊ शकतात. यामुळे वजन वाढू शकते आणि लठ्ठपणा येऊ शकतो.
याशिवाय, टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो. तीव्र वेदनांची संवेदनशीलता वाढू शकते. अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंश यासह न्यूरोलॉजिकल विकार विकसित होण्याचा धोका वाढू शकतो. तसेच वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होण्यास मदत होते. ज्यामुळे अकाली सुरकुत्या दिसू लागतात आणि त्वचेची लवचिकता देखील कमी होते. त्यामुळे पुरेशी झोप मिळेल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.