इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक रेंजचे स्मार्टफोन उपलब्धआहेत. युजर्स त्यांच्या बजेट आणि गरजेनुसार आता कोणताही फोन खरेदी करू शकतात. जर तुम्ही बजेट फोनवरून प्रीमियम फोनवर स्विच करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला प्रीमियम फोनच्या फीचर्सची माहिती असणे आवश्यक आहे. प्रीमियम फोन केवळ चांगले दिसत नाहीत तर युजर्सच्या सोयीसाठी अनेक फीचर्सही दिले जात आहेत.
AI फीचर्स खूप लोकप्रिय होत आहेत. भविष्यात AI चा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार असा विश्वास आता व्यक्त केला जात आहे. त्यानुसार, कंपन्यांकडून फीचर्सही दिले जात आहेत. स्मार्टफोन कंपन्या युजर्सच्या सोयीसाठी फोनमध्ये AI पॉवर्ड फीचर्सही देत आहेत. लाईव्ह ट्रान्सलेशन, ऍपल इंटेलिजन्स, व्हिज्युअल इंटेलिजन्स, झेनमोजी यांसारखे अनेक फिचर्स फोनमध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत. यात स्मार्टफोनचा डिस्प्ले हा सर्वात जास्त वापरला जाणारा भाग आहे. त्यामुळे, डिस्प्ले तुम्हाला Smooth आणि चांगला असा मिळू शकणार आहे.
स्मार्टफोन निर्माता कंपन्या फोनसोबत सॉफ्टवेअर अपडेट देण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही चांगली सुरक्षा आणि सॉफ्टवेअर अपडेट्स असलेला फोन विकत घ्यावा, जेणेकरून तुमचा फोन दीर्घकाळ नवीन आणि अपडेटेड राहू शकेल. अनेक कंपन्या प्रीमियम फोनसाठी 6-7 वर्षांच्या सॉफ्टवेअर अपडेट्सची हमी देत आहेत.