Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजतुम्ही निवृत्तीनंतर होऊ शकता 'मालामाल'; 'ही' योजना बनवेल लखपती

तुम्ही निवृत्तीनंतर होऊ शकता ‘मालामाल’; ‘ही’ योजना बनवेल लखपती

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

नवी दिल्ली : नोकरीतून निवृत्त झाल्यावर पैसे मिळणे अनेकांचे बंदहोते. तर काहींना पेन्शनही मिळते. तुम्हाला निवृत्तीनंतर चांगले पैसे हवे असतील तर एक योजना आहे, त्याने तुम्ही मालामाल होऊ शकता. याची माहिती आम्ही तुम्हाला आज देत आहोत. जर तुमचं वय आता 35 वर्षांचे असले तरी, पुढील 25 वर्षांत तुम्ही चांगला निवृत्ती निधी गोळा करू शकता.

सध्या जर तुम्ही 35 वर्षांचे असाल तर 10 वर्षांत चांगले पैसे वाचवण्याचे उद्दिष्ट ठेवा. पुढील 25 वर्षांत चांगला निधी जमेल याची खात्री करा. त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात करा. जर तुम्ही राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस) मध्ये योगदान देत असाल तर आता तो दरमहा 20000 रुपये म्युच्युअल फंडात गुंतवू शकता. जर पगार दरवर्षी ७% ने वाढला तर त्यानुसार योगदान देखील वाढते. अशा परिस्थितीत, १०% वार्षिक चक्रवाढ व्याजदरानुसार, त्यांची NPS गुंतवणूक २५ वर्षांत लाखो रुपयांपर्यंत वाढू शकते.

एनपीएसमध्ये गुंतवणूक करून, निवृत्तीनंतर चांगला निधी मिळू शकतो. मात्र, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, निवृत्तीच्या वेळी एनपीएस निधीपैकी फक्त ६० टक्के रक्कम एकरकमी काढता येते. उर्वरित ४० टक्के रक्कम अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरली पाहिजे. अॅन्युइटी म्हणजेच तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम मिळते ती असते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments