Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज तुम्हालाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा व्हीआयपी पास हवाय का? सोशल मीडियावर फिरताहेत...

तुम्हालाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा व्हीआयपी पास हवाय का? सोशल मीडियावर फिरताहेत मेसेज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. त्याचाच फायदा घेत सायबर चोरट्यांनी भाविकांना लुटण्याची नवी शक्कल लढवली असल्याचे काही घटनांवरून समोर आले आहे. ‘तुम्हाला राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा व्हीआयपी पास हवा आहे का?’ अशा आशयाचा मेसेज पाठवून लूट केल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नये आणि सायबर फसवणुकीला बळी पडल्यास तत्काळ सायबर पोलिसांना कळवावे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर सेलकडून करण्यात आले आहे.

राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त देशभरात राममय वातावरण झाले असताना अनेकजण रामभक्तांची फसवणूक करत आहेत. सोशल मीडियावर क्यूआर कोड पाठवून राममंदिरासाठी देणगी देण्याचे आवाहनही केले जात आहे. त्याचबरोबर व्हीआयपी पासच्या नावाखाली क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे उकळले जात आहेत. अशा घटनांपासून सावध राहावे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी कोणत्याही संस्थेला अशाप्रकारे निधी गोळा कारण्यासाठी किंवा व्हीआयपी पास देण्यासाठी परवानगी दिलेली नसल्याची माहिती रामजन्मभूमी मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे.

अशा पद्धतीने होतेय भक्तांची लूट…

सायबर चोरटे व्हॉट्सअॅपवर किंवा मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवून २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी व्हीआयपी पास मोफत मिळण्याचा दावा करतात. त्यानंतर पुढे मेसेजमध्ये रामजन्मभूमी ट्रस्टच्या वतीने तुम्हाला व्हीआयपी एंट्री पास देण्यात येईल असे सांगितले जाते. पास मिळवण्यासाठी एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. लिंकवर क्लिक करताच अनोळखी अॅप्लिकेशन डाउनलोड होते. काही मेसेजमध्ये व्हीआयपी प्रवेश एक्सेस मिळवण्यासाठी राम जन्मभूमी गृहसंपर्क अभियान नावाची फाईल इन्स्टॉल करण्यास सांगितले जाते. खासगी डाटा चोरून खाते रिकामे केले जाते.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments