इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : सध्या अनेक सरकारी कामांसह इतर बहुतांशकामांमध्ये आधारकार्ड गरजेचे बनले आहे. शाळा असो, बँक असो की नोकरी, आधार कार्ड जवळपास सर्वत्र वापरले जाते. सिम खरेदी करण्यासाठीही आधार कार्डचा वापर केला जातो. त्याच वेळी, तुमच्या आधार कार्डवर किती सिम अॅक्टिव्ह आहेत हे तुम्ही सहज शोधू शकता. याच्या मदतीने तुम्ही स्वतःला फसवणूक होण्यापासून वाचवू शकता.
आधारकार्डवरून किती सिम अॅक्टिव्ह आहेत हे घरबसल्या शोधता येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला ‘आधार लिंकिंग’ किंवा ‘व्हेरिफाय नंबर’चा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि तुम्ही हे करताच तुम्हाला एक OTP प्राप्त होईल. OTP टाकल्यानंतर, तुमच्या आधारकार्डवर किती क्रमांक अॅक्टिव्ह आहेत हे तुम्हाला कळू शकेल.
या माहितीसाठी तुम्ही https://www.sancharsaathi.gov.in/वेबसाइटचीही मदत घेऊ शकता. येथे Citizen Centric Services चा पर्याय निवडा. येथे Know Mobile Connections (TAFCOP) चा पर्याय निवडा. OTP टाकल्यानंतर तुम्ही TAFCOP वर लॉगिन करू शकता. पडताळणीनंतर तुम्हाला कळेल की तुमच्या आधारशी किती नंबर जोडले गेले आहेत.