इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेकांकडे हा फोन दिसून येतो. जेव्हा या फोनचा वापर जास्त होतो, तेव्हा फोन गरम व्हायला लागतो. ही समस्या जरी सामान्य वाटत असली तरी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचा तापलेला फोन काही मिनिटांत नॉर्मल करता येऊ शकतो. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
अतिउष्णतेमुळे मोबाईल फोनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि बॅटरी देखील खराब होऊ शकते. स्मार्टफोनचा वापर बहुतांश कामांसाठी केला जातो. अनेक वेळा लोक तासन् तास फोन वापरत राहतात. जर तुमचा स्मार्टफोन जास्त गरम होत असेल तर तो बंद करावा. जर तुमचा फोन जास्त गरम होत असेल तर काही वेळ फोन वापरू नका. तो बंद करून ठेवा. तसेच फोन थंड ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा. अशाने फोनचे तापमान झटकन कमी होण्यास मदत होऊ शकते.
अनावश्यक अॅप्स बंद करण्याला प्राधान्य द्या. तुम्ही वापरत नसलेले अॅप्स बंद करा. बॅकग्राऊंडला चालणारे अॅप्स बंद करा. पॉवर सेव्हिंग मोड बॅटरीचा वापर कमी करू शकतो. त्यामुळे हा मोड चालू करा. तसेच फोन चार्ज होत असताना वापरू नका किंवा फोनवर बोलू नका. याने मोठी दुर्घटना घडू शकते. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर कव्हर किंवा केस तापत असेल तर ती पूर्णपणे काढून टाका. यानेदेखील चांगला परिणाम दिसू शकतो.