Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजतिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या...

तिघांविरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलः बांधकाम सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या सहाव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्देवी मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बांधकाम सुरू असलेल्या एका गृहप्रकल्पात काम करणारा मजूर सहाव्या मजल्यावरून पडून दुर्देवीरीत्या मयत झाल्याची घटना मुंढवा भागात घडली. मजुराच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदारासह तीन जणांना विरोधात मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

रणधीरकुमार मोहता असे मयत झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम ठेकेदार मोहन वसंत मालवडकर यांच्यासह तिघां आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी अक्षय धुमाळ यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मुंढवा भागात एका गृहप्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. सहाव्या मजल्यावर रणधीरकुमार काम करत होता. त्यावेळी लिफ्टच्या मोकळ्या जागेत काम करणारा रणधीरकुमार खाली पडला. सहाव्या मजल्यावरून तो खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्त्राव झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांपूर्वीच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता. गृहप्रकल्पात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेसाठी जाळी न बसविणे, तसेच पुरेशी सुरक्षाव्यवस्था न केल्याप्रकरणी पोलिसांनी बांधकाम ठेकेदारासह तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक एस बिनवडे पुढील तपास करत आहेत.

ट्रकचालकाला लुटणाऱ्या चोरट्याला पकडले

पुणे शहरातील मार्केट यार्डात शेतीमाल वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली. प्रकाश उर्फ पक्या देवराम परिहार (वय २५, रा. राम मंदिराजवळ, लोहियानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मार्केट यार्डातील केळी बाजार परिसरात ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून परिहारने त्याच्याकडील मोबाइल आणि रोकड लुटली होती. ट्रकचालकाने याबाबत मार्केट यार्ड पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी तपास करून परिहारला अटक केली. त्याच्याकडून सहा मोबाइल संच, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, सहायक निरीक्षक मदन कांबळे, थोरात, गायकवाड, यादव, झायटे यांनी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments