इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : माजी मंत्री तानाजी सावंत यांचा लहानमुलगा ऋषीराज याचं अपहरण झाल्याची बातमी प्रसारित झाली आणि एकच खळबळ उडाली होती. पण त्यानंतर खरी माहिती समोर आली होती. ऋषीराज हा मित्रांसमवेत बकॉकला निघाल्याचं समोर आलं होतं. तानाजी सावंत यांनी सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेत याबाबतची सविस्तर माहिती दिली होती. आता तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी आपल्या भावाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याचवेळी आमच्या घरात कोणताही वाद नसल्याचेही स्पष्ट केलं आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीराज सावंत ?
काल दुपारी ऋषीराज यांचा मोबाईल नंबर लागला नाही. फोन बंद असल्यामुळे आमचा गोंधळ उडाला. आम्ही तात्काळ पोलिसात तक्रार दाखल दिली आणि पोलिसांनी सहकार्य केलं. आमच्या घरात कुठलाही वाद नाही, असे गिरीराज सावंत यांनी सांगितले. म्हणाले. ऋषीराज यांनी रागारागाने घर सोडल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. सावंत कुटुंबात वाद आहे का? अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. परंतु, गिरीराज सावंत यांनी या चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
आमच्या कुटुंबाबाबत राजकारण करू नये..आमच्या घरात कसलेही वाद नव्हते आणि नाहीत. ऋषीराज दुबईवरून आला होता आणि परत व्यवसायाच्या निमित्ताने बँकॉकमध्ये जाणार होता. पण दुबई वरून आल्या आल्या मला बँकॉककडे सोडतील का? या भीतीने तो निघून गेला, असे गिरीराज सावंत यांनी सांगितले. आमच्या कुटुंबाबाबत कोणीही राजकारण करू नये. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी आम्ही सोमवारी चर्चा झाली. पोलिसांकडून या घटनेचा पूर्ण तपास सुरू आहे, असेही गिरीराज यांच्याकडून सांगण्यात आले आहे.