Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीलाः ईव्हीएम चोरताना चोर सीसीटीव्हीमध्ये कैद, कंट्रोल...

तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीलाः ईव्हीएम चोरताना चोर सीसीटीव्हीमध्ये कैद, कंट्रोल युनिट लंपास, पुण्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे जिल्हयातील सासवड येथील तहसीलदार कार्यालयाचे कुलुप अज्ञात व्यक्तींनी तोडून कार्यालयातून ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या खोलीतून ईव्हीएम मशीनचे एक डेमो मशीन चोरी करुन नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या चोरीची घटना तहसीलदार कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाली असून त्याआधारे आरोपींची ओळख पटवून पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेले आहे.. ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिट चोरी गेले ही अत्यंत धक्कादायक बाब आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक लवकरच होणार असून त्याअनुषंगाने प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या असून सोमवारी रात्री तीन अज्ञात चोरटयांनी तहसीलदार कार्यालयाचे कुलुप कशाचेतरी सहाय्याने तोडून खोलीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी खोलीत एका रॅकवर ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन पैकी एका डेमो ईव्हीएम मशीन उचलून सोबत नेली. या घटनेची माहिती मिळताच, सासवड पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, त्यांना चोरटयांनी ईव्हीएम मशीन पळवून नेतानाचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले. त्याआधारे फरार झालेल्या तीन अज्ञात चोरटयांचा माग पोलिस काढत आहे.

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले की, या गुन्हयाचे अनुषंगाने सासवड पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासवड तहसीलदार कार्यालयात एकूण 40 ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेले होते. परंतु तीन चोरटयांन त्यापैकी केवळ एक ईव्हीएम डेमो युनिट चोरी करुन नेले आहे. नेमके कोणत्या कारणास्तव त्यांनी ईव्हीएम मशीन चोरी केले याचा अद्याप उलगडा झालेला नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments