Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज तळेगाव दाभाडे पालिकेचा जेसीबी जळून खाक, अज्ञाताने लावली आग

तळेगाव दाभाडे पालिकेचा जेसीबी जळून खाक, अज्ञाताने लावली आग

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

तळेगाव दाभाडे (पुणे) : तळेगाव दाभाडे नगरपालिकेचा जेसीबी जळून खाक झाला. ही दुर्घटना कचरा डेपो (मोरखळा) येथे मंगळवारी (दि. ९) पहाटे घडली. आगीचे कारण समजू शकले नाही. यासंदर्भात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद देण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने हा जेसीबी अशोक इंटरप्रायजेस या ठेकेदार एजन्सीकडे भाडेतत्त्वावर दिला होता. अज्ञाताने कचऱ्यास आग लावल्याने जेसीबी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जेसीबी जळाल्याची दुर्घटना घडली, त्यावेळी सुरक्षारक्षक काय करत होता, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मागील अनेक महिन्यांपासून हा जेसीबी कचरा डेपो येथे होता. सोमवारी सायंकाळी काम उरकल्यानंतर चालकाने जेसीबी कचरा डेपोमध्ये नेहमीच्या ठिकाणी लावला.

आगीच्या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांना दिली. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली; मात्र आगीचे कारण अनुत्तरित आहे. दरम्यान, यासंदर्भात मंगळवारी सायंकाळी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments