इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिक्रापूर : शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. विशाल प्रकाश जेधे (वय ३० रा. जेधे वस्ती तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, जेधे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
याबाबत अभिजित प्रकाश जेधे (वय ३४ रा. जेधे वस्ती तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील विशाल जेधे हे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले असता सायंकाळच्या सुमरास अचानक शेतात पडले.
यावेळी शेजारील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी विशाल यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहेत.