Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज तळवडे आग दुर्घटनेतील आणखी २ महिलांचे निधन; ५ महिलांवर उपचार सुरु

तळवडे आग दुर्घटनेतील आणखी २ महिलांचे निधन; ५ महिलांवर उपचार सुरु

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : शहरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेत जखमी रुग्ण प्रियंका यादव (वय ३२ वर्षे) यांचे रात्री पावणे दोन वाजता तर अपेक्षा तोरणे (वय १८ वर्षे) यांचे सकाळी साडे सहा वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान आज गुरुवारी (दि. १४) निधन झाले. तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या ११ इतकी झाली आहे.

तळवडे तेथील एका कारखान्यामध्ये दि. ८ डिसेंबरला घडलेल्या आग दुर्घटनेत ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर १० जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारांसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील प्रतिक्षा तोरणे (वय १६ वर्षे) आणि कविता राठोड (वय ४५ वर्षे) यांचे शनिवारी (दि.९) तर शिल्पा राठोड (वय ३१ वर्षे) यांचे रविवारी (दि. १०) ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, सुमन गोंधळे, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महापालिकेचा मदत कक्ष…

उपचारासाठी दाखल असलेल्या तळवडे आग दुर्घटनेतील जखमी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ससून रुग्णालयामध्ये मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि २ मदतनीस यांची २४x७ नेमणूक करण्यात आली आहे. या रुग्णांच्या प्रकृतीविषयी आयुक्त शेखर सिंह विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच ते वेळोवेळी या रुग्णांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेत आहेत.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments