Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजतळजाई वसाहत परिसरात कोयत्याने वार करुन पसरवली दहशत; तडीपार गुंडासह तिघांना अटक

तळजाई वसाहत परिसरात कोयत्याने वार करुन पसरवली दहशत; तडीपार गुंडासह तिघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यात एका तडीपार गुन्हेगाराने व त्याच्या इतर दोन साथीदारांनी एका व्यक्तीच्या घरात घुसून कोयत्याने वार करुन परिसरात दहशत पसरवल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.१५) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास तळजाई वसाहत, पद्मावती परिसरात घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

याबाबत गुनाजी आण्णा वाघमारे (वय-४३ रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून राजू संजय लोंडे उर्फ डड्या (वय-२६), राज रवि वाघमारे उर्फ हीरव्या (वय-१८ रा. दोघे रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे), सुशील गोरे (वय-१८) यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १५) मे रोजी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या वस्तीत आले. काहीही कारण नसताना आरोपी फिर्यादी यांच्या घरात घुसले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ करत फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले. त्यावेळी परिसरातील नागरिक जमा झाले असता आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत पसरवली.

तसेच आमची पोलिसांकडे तक्रार केली, तर वाघमारे कुटुंबाला जगू देणार नाही, अशी धमकी देऊन निघून गेले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नलावडे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments