Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजतरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरणः करून बलात्कार करणारा आरोपी गजाआड

तरुणीला पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरणः करून बलात्कार करणारा आरोपी गजाआड

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एका तरुणीला पिस्तुलाच्या धाक दाखवून तिचे अपहरण करून एका तरुणाने संबधित तरुणीशी बळजबरीने लग्न केले. तसेच तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकास चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित 22 वर्षीय तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी महेंद्र सीताराम वेताळ (रा. भावडी, ता. हवेली), अमोल जाधव (रा. लोणीकंद, ता. हवेली) यांच्याविरुद्ध बलात्कार, बेकायदा शस्त्र बाळगणे, जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेंद्र वेताळ याला अटक करण्यात आली आहे. संबंधित गुन्हा लोणीकंद पोलिसांनी चंदननगर पोलिसांकडे सोपविला आहे.

पीडित तरुणी आणि आरोपी वेताळ ओळखीचे आहेत. दोन दिवसांपूर्वी ती खराडीतून निघाली होती. त्यावेळी मोटारीतून वेताळ आणि जाधव तेथे आले. आरोपींनी तिला पिस्तूल आणि कोयत्याचा धाक दाखविला. त्यानंतर तरुणीचे अपहरण करण्यात आले. तरुणीला धमकावून त्याने तरुणीशी विवाह केला. तिची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित केली.

त्यानंतर तरुणीला निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घाबरलेल्या तरुणीने घरी सोडण्याची विनंती आरोपीकडे केली. तेव्हा आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली. तरुणीला मोटारीतून तुळापूर फाटा येथे सोडून आरोपी पसार झाले. तरुणीने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संबंधित गुन्हा चंदननगर पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला असून, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील तपास करत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments