Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजतरुणीची ऑनलाईन 14 लाखांची फसवणूकः तुमचे बँक खाते दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचा...

तरुणीची ऑनलाईन 14 लाखांची फसवणूकः तुमचे बँक खाते दहशतवाद्यांशी संबंधित असल्याचा सांगत अज्ञात महिलेचा आला होता फोन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यात राहणाऱ्या एका तरुणीला अज्ञात महिलेने फोन करुन एनसीबीचे अधिकार असल्याचे सांगत, तुमच्या नावाने मुंबई ते तैवान दरम्यान जात असलेले एक ड्रगजचे पार्सल आम्हाला भेटल्याचे सांगण्यात आले. तसेच आपले बँक खाते देखील दहशतवाद्यांशी संबंधीत असून त्यात तुम्हाला आरोपी न करण्यासाठी व कारवाई टाळण्यासाठी आरोपींनी बँक खात्याची माहिती घेत तब्बल 13 लाख 95 हजार रुपये परस्पर हस्तांतरित करुन घेत आर्थिक फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी २८ वर्षीय तरुणीने आरोपी भाव्या सिंग नावाची महिला, मुंबई एनसीबी डिपार्टमेंट नावाची वेबसाईट, तसेच आरोपींचे बँक खातेधारक यांचे विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ही खासगी कंपनीत नोकरीस असून ती राहते घरी असताना तिच्या मोबाईल क्रमांकावर फेडेक्स कंपनी, मुंबई, अंधेरी इस्ट बँच येथून भाव्या सिंग नावाचे महिलेचा फोन अाला. तीने ती एनसीबीचे अधिकारी बोलत असल्याचे भासवून तक्रारदार हिच्या नावाने मुंबई ते तैवान असे एक पार्सल जात असल्याचे सांगितले. त्यात पाच एक्सपायर पासपोर्ट, आयसीआयसीआय बँकेचे सहा क्रेडिट कार्ड, तीन किलो कपडे, दोन लॅपटॉप व ९५० ग्रॅम ड्रगज मिळाले असल्याचे सांगितले.

सदरचे पार्सल हे मुंबई विमानतळ येथे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई यांनी पकडले आहे, असे खोटे सांगून आपल्या बँक आपल्या खात्याबाबत दहशतवादयांशी संबंधीत आहे, असे सांगण्यात आले. कारवाईची मनात भिती निर्माण करुन त्यांच्या बँक खशत्यातून बेनिफिशीअर खात्यावर १३ लाख ९५ हजार रुपये पाठविण्यास भाग पाडून फसवणुक करण्यात आली.

आमच्या महिला अधिकारी असून त्या तुमच्या शरीरावर कुठे तीळ आहे का? हे जबरदस्तीने दाखविण्यास स्काईप अायडीवरुन दाखविण्यास भाग पाडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली आहे. याप्रकरणी पुढील तपास हा विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments