Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजतरुणाला हातातील लोखंडी कड्याने तोंड व डोक्यावर मारहाण करून नाकाचे हाड फॅक्चर...

तरुणाला हातातील लोखंडी कड्याने तोंड व डोक्यावर मारहाण करून नाकाचे हाड फॅक्चर करत केली शिवीगाळ; उरुळी कांचन येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे) : किरकोळ कारणावरून एकाने हातातीललोखंडी कड्याने तोंडावर आणि डोक्यामध्ये मारहाण करून नाकाचे हाड फॅक्चर करुन शिवीगाळ गेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (2 फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास हॉटेल ग्रीन पार्क येथे हि घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात मंगळवारी (4 फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश उर्फ आप्पा तुकाराम कांचन, रा. पांढरस्थळ उरुळीकांचन, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर उमेश अर्जुन कांचन, (वय-44, व्यवसाय मजुरी, रा. उरुळी कांचन चौधरी माथा, ता. हवेली) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार योगेश कांचन याच्यावर कलम 118(2), 352,351(2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन गावाच्या हद्दीतील ग्रीन पार्क हॉटेल येथे राजेश लक्ष्मण बगाडे यांच्याकडे उमेश कांचन यांचे उधारीचे पैसे होते. उधारीचे पैसे आणण्यासाठी गेले असता हॉटेलवर योगेश उर्फ आप्पा कांचन हा बसलेला होता.

यावेळी योगेश कांचन याने काही एक कारण नसताना त्याचे हातातील लोखंडी कड्याने तोंडावर, डोक्यामध्ये मारहाण केली. या मारहाणीत कांचन यांना गंभीर दुखापत झाली आहे. तसेच नाकाचे हाड फॅक्चर करुन शिवीगाळ केली. जाताना तुला बघुन घेतो असा दम दिला. असे फिर्यादीत नमूद कण्यात आले आहे.

दरम्यान, याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल खोमणे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments