Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजतरुणाने पोलिस चौकीपुढेच घेतले स्वतःला पेटवूनः पुण्यातील भयंकर घटना, तरुणाची तब्येत चिंताजनक,...

तरुणाने पोलिस चौकीपुढेच घेतले स्वतःला पेटवूनः पुण्यातील भयंकर घटना, तरुणाची तब्येत चिंताजनक, उपचार सुरू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील वाघोली पोलीस चौकीसमोर मंगळवारी एका तरुणाने ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून स्वतःला पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. संबधित तरुण पोलीस चौकी समोर सकाळी 11 वाजता आला. त्यानंतर त्याने पेट्रोल अंगावर टाकून स्वतःला पेटवून घेतले. यात तरुण 90 टक्के भाजला असून गंभीर जखमी झाला आहे. त्याला जवळच्या तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याची परिस्थिती चितांजनक आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

रोहिदास अशोक जाधव (वय 28, रा. सिद्धी अपार्टमेंट, वाघोली, पुणे) असे पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. यामध्ये तरुण गंभीररीत्या 90 टक्के भाजला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. परंतु त्याची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, रोहिदास जाधव या तरुणाला मारहाण झाली होती. या प्रकरणी पोलीसांनी आरोपीवर अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर अटक कारवाई केली नसल्याने तो आरोपीला अटक करण्याची मागणी करत होता. मात्र, पोलिसांनी आरोपीवर कारवाई केली नसल्याच्या रागातून रोहिदासने मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास वाघोली पोलिस चौकी समोर येत स्वतःला अचानक पेटून घेतले. यामध्ये तो 90 टक्के भाजलेला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले होते. याबाबत पुढील तपास लोणीकंद पोलिस करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments